गणेशोत्सवापूर्वी भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; ३ गावठी कट्टे व ४ जिवंत काडतुसांसह दोन सराईत अटक !!


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ३ गावठी कट्टे व ४ जिवंत काडतुसांसह दोघांना अटक  !!

पुणे:

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत मागील दोन दिवसांत तीन गावठी बनावटीचे कट्टे आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोन सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली कारवाई (दि. २६ ऑगस्ट २०२६):भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना, रात्री ११:५२ वाजता साई सिद्धी चौक ते चिंतामणी ज्ञानपीठ दरम्यानच्या गल्लीत ओंकार उर्फ बब्या संतोष पवार (वय १८, रा. आंबेगाव पठार, पुणे) हा संशयितरीत्या आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ गावठी कट्टा आणि २ जिवंत काडतुसे मिळून आली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा रजि. क्र. ४४१/२०२६ नुसार भारतीय हत्यार अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई:कात्रज डेअरी चौक ते सरहद चौक दरम्यानच्या परिसरात बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. यावेळी शिरीष जितेंद्र खोपडे (वय २६, रा. आंबेगाव पठार, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून २ गावठी कट्टे आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याविरुद्ध गुन्हा रजि. क्र. ४४४/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस आयुक्त परिमंडळ ०२ चे मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रवी जाधव, तसेच पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी आणि सहकाऱ्यांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली.

सणोत्सवाच्या काळात अशा प्रकारची गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.


अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना डॉ.महेंद्र शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

error: Content is protected !!