CEIR पोर्टलच्या मदतीने लोणी काळभोर पोलिसांची चमकदार कामगिरी; १० हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना केले परत


भारत सरकारच्या ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर’ (CEIR) पोर्टलचा प्रभावी वापर करत लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या सायबर सेलने एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलिसांनी हरवलेले १० मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना सुरक्षितपणे परत केले आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या या मोबाईल फोनची एकूण किंमत सुमारे ₹३,४०,०००/- इतकी आहे.

तंत्रज्ञानाचा वापर अन् तांत्रिक विश्लेषण..

लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नागरिकांनी CEIR पोर्टलवर दाखल केलेल्या तक्रारींच्या आधारे सायबर सेलने तांत्रिक विश्लेषण सुरू केले. मोबाईलच्या IMEI क्रमांकाचा मागोवा घेत, विविध जिल्हे आणि राज्यातील पोलीस यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधून पाठपुरावा करण्यात आला. या अथक प्रयत्नांनंतर १० मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश आले.

CEIR पोर्टलच्या माध्यमातून हरवलेले किंवा चोरीस गेलेले मोबाईल फोन सहज ब्लॉक आणि ट्रॅक करता येतात, ज्यामुळे नागरिकांना त्यांचे मोबाईल परत मिळण्यात मोठे साहाय्य होत आहे.

पोलीस यंत्रणेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक..

ही कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ६) श्री. जीवन बेनिवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (लोणी काळभोर विभाग) श्रीम. अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. नंदकुमार कोळी व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कृष्णा बाबर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार योगेश पाटील, महिला पोलीस अंमलदार उषा थोरात आणि कौशल्या शिंदे यांनी ही यशस्वी कामगिरी केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!