पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना: अश्लील व्हिडीओ दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण!!!!


पुण्यात धक्कादायक प्रकार: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार; अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल!!!!

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका 33 वर्षीय तरुणीवर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप अक्षय संदीप बागुल या एका तरुणावर करण्यात आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पीडित तरुणीशी ओळख झाल्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. या विश्वासावर आरोपीने 2023 पासून ऑक्टोबर 2025 पर्यंत विविध ठिकाणी नेऊन तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तसेच मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवत अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचाही आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, आरोपीकडून वारंवार भांडणे करून शिवीगाळ केली जात होती तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. पुढे लग्नाबाबत दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा सुरू असताना आरोपीने बैठकीदरम्यान जातिवाचक शिवीगाळ केल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, आरोपीने अचानक लग्नास नकार दिल्यानंतर तसेच आपल्यावर शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण झाल्याची जाणीव झाल्यानंतर पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे आरोपी अक्षय संदीप बागुल (वय 33, रा. साई पार्क सोसायटी, त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ परिसर) याच्यावर बलात्कार तसेच अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे करत असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, लग्नाचे आमिष दाखवून महिलांचे शोषण केल्याच्या घटना अधूनमधून समोर येत असून अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


10
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!