पुणे कॅम्प मध्ये डॉ. बाबासाहेब स्मारका समोर लघुशंका; दलित पँथरच्या हस्तक्षेपाने इसम अटकेत!!!!


पुणे कॅम्पमध्ये डॉ. बाबासाहेब स्मारकासमोर लघुशंका; दलित पँथरच्या हस्तक्षेपाने इसम पोलिसांच्या ताब्यात!!!!

पुणे (प्रतिनिधी): Pune शहरातील कॅम्प परिसरात Diamond Hotel समोर असलेल्या Dr. Babasaheb Ambedkar स्मारक येथे एका इसमाला सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करताना पकडण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष संध्याकाळी घरी जात असताना संबंधित इसम “मी इथला भाई आहे” असे हात वर करून ओरडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ गाडी थांबवून आपल्या सहकाऱ्याला पाठवले. त्या व्यक्तीला खाली उतरवून पॅंथर स्टाईलने समज देण्यात आली.

यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन आरोपीला ताब्यात घेतले. संबंधित इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

स्मारका सारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारे असभ्य कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, सर्व अनुयायांची मागणी होत आहे.


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!