काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; आरोपी कडून एक गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसे जप्त!!!!


पुणे (प्रतिनिधी सोहम):

काळेपडळ पोलीस स्टेशन यांच्या पथकाने केलेल्या धडाकेबाज कारवाईत गुन्हेगार इरफान रईसुद्दीन मलिक (रा. स. नं. ६८/१बी/३, कोंढवा, पुणे) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून १ गावठी बनावटीची पिस्तुल व २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुणे शहर कार्यक्षेत्रात अवैध धंदे, तडीपार इसम व बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी इरफान मलिक हा संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडील शस्त्र व जिवंत राऊंड जप्त करण्यात आले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध आर्म्स अ‍ॅक्ट कलम ३(२५), ४(२५) तसेच मुंबई पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे (परिमंडळ ६, पुणे शहर), सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले (हडपसर विभाग, अति. कार्य) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील (काळेपडळ पोलीस स्टेशन) यांच्या सूचनेनुसार पार पडली.

कारवाईत पोलीस निरीक्षक अमित शेळके, पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव, पोलीस हवालदार प्रवीण काळभोर, तसेच राजू सय्यद, प्रतिक लाहुगे, विशाल डांगे, शाहिद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, सदाम तांबोळी, प्रदीप बेडकर, महादेव शिंदे आणि गिरीराज जगताप यांनी सहभाग घेतला.

 


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!