हॉटेल व्यावसायिकास प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ४० लाखांची खंडणी; फलटण शहर पोलिसांची मोठी कारवाई!!!!


हॉटेल व्यावसायिकास प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ४० लाखांची खंडणी; फलटण शहर पोलिसांची मोठी कारवाई

 

फलटण : एका हॉटेल व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मारहाण करून तब्बल ४० लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात फलटण शहर पोलिसांना यश आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. ११/०२/२०२६ रोजी फिर्यादी श्री. आनंद काशिनाथ दळवी (रा. कापुरहोळ, ता. भोर, जि. पुणे) यांना फलटण येथील एका महिलेने मोबाईलवर “Hi” असा मेसेज करून संपर्क साधला. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दि. १३/०२/२०२६ रोजी दुपारी १२.१५ वा. दरम्यान बुधवारपेठ, फलटण येथील फ्लॅटवर बोलावून नेऊन कटकारस्थान रचत बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.

यानंतर आरोपी

1. साहिल रवी तारे (राहणार दत्तनगर फलटण)

2. वैभव बाळासाहेब सस्ते (रा. सस्तेवाडी, ता. फलटण),

3. रोहन नवीन काकडे (राहणार मंगळवार पेठ फलटण )

4. विनायक बाळासो जाधव (रा. ठाकूरवाडी ठाकूरवाडी, ता. फलटण),

5. राज राम बोके (रा. मंगळवार पेठ ता. फलटण, जि. सातारा),

6. विजय दत्तू ननवरे (रा. झिरपे गल्ली, मंगळवार पेठ फलटण),

7. तुषार उर्फ गदॄया संजय ननवरे (रा. झिरपे गल्ली मंगळवार पेठ, फलटण),

8. सागर उर्फ टक्क्या मोहन साळुंखे (रा. वीर, ता. पुरंदर, जि. पुणे),

9. राहुल रामचंद्र जगताप (रा. कसबा पेठ पवार गल्ली जबरेश्वर मंदिराजवळ फलटण),

तसेच एक महिला आरोपी,

यांनी संगनमत करून फिर्यादीस शिवीगाळ व मारहाण केली आणि ४० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यापैकी १,१५,००० रुपये रोख व एटीएम/क्रेडिट कार्डद्वारे रक्कम उकळली. तसेच पुणे रस्त्यावर गाडी अडवून फिर्यादीच्या गळ्यातील २० तोळे वजनाची सुमारे ३० लाख रुपये किंमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली.

 

फिर्यादीच्या तक्रारीवरून फलटण शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ४४/२०२६ भा.दं.सं. कलम ३०८(५), ३०८(६), ३०९(६), १२६, ६१(२), ११५(२), ३५२ ३५१(२) ३५१(३) अन्वये दि. १४/०२/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नितीन शिंदे हे करीत असून, मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. शैलजा कडुकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण श्री. विशाल कृष्ण खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

 

प्रभारी अधिकारी श्री. अरविंद काळे, पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करून आरोपींना अटक केली. आरोपींकडून २९,६२,८०९ रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असून, त्यात २१,६२,८०९ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ३,२०,००० रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली वाहने व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषारर दोशी, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती डॉ. वैशाली कडूकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण, श्री. विशाल कृष्ण खांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अरविंद काकडे, सहायक पोलीस निरीक्षक श्री. नितीन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्री. दिनेश शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक आयोध्या घोरपडे, पोलीस अमलदार नागासो होले, नितीन सजगणे, बापूराव धायगुडे, संतोष नळे, जितेंद्र टिळे, काकासो कर्णे, अतुल बडे, मुकेश घोरपडे, महेश जगदाळे, निखिल गायकवाड, जयदीप यादव, गणेश अवघडे, विक्रम कुंभार यांनी पूर्ण केली आहे.

 

सदर गुन्ह्यातील ५ आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 

फलटण शहर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!