प्रज्ञा प्राथमिक विद्यालयाचा शासकीय रेखाकला परिक्षेत सलग १३व्या वर्षी १००%निकालाचा धडाका !!!


*प्रज्ञा प्राथमिक विद्यालयाचा शासकीय रेखाकला परीक्षेत सलग १३ व्या वर्षी १००% निकालाचा ‘धडाका’* 

 

फुरसुंगी (पुणे):

येथील आदर्शनगर (गंगानगर) परिसरातील नवचैतन्य मित्र मंडळ संचलित, प्रज्ञा प्राथमिक विद्यालयाने शासकीय रेखाकला परीक्षा २०२५-२६ (एलिमेंटरी ग्रेड) मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. *विद्यालयाने सलग १३ व्या वर्षी १००% निकालाची आपली उज्ज्वल परंपरा कायम राखत शैक्षणिक व कला क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे.*

शासकीय रेखाकला परीक्षेसाठी विद्यालयातील फुरसुंगी केंद्रातून एकूण ३४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवले असून, श्रेणीनिहाय निकाल खालीलप्रमाणे आहे:

‘अ’ (A) श्रेणी: *०४* विद्यार्थी

‘ब’ (B) श्रेणी: *२१* विद्यार्थी

‘क’ (C) श्रेणी: *०९* विद्यार्थी

*विशेष म्हणजे, आदिती चकोटे, हर्षिता यादव, आरती गणगे आणि अमृता शर्मा या विद्यार्थ्यांनी ‘अ’ श्रेणी प्राप्त करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.* *या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक श्री. सुहास गवळी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.*

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल नवचैतन्य मित्र मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. अशोक सुरवसे, सचिव शरणम गायकवाड व सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ससाणे सुवर्णा दशरथ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

 

*”विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते, याच मेहनतीचे फळ म्हणजे हा १००% निकाल आहे,” अशी भावना मुख्याध्यापिकांनी यावेळी व्यक्त केली.*

सर्व शिक्षकवृंद, पालक आणि परिसरातील नागरिकांनी यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.


13
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!