शिवसेना शिंदे गटाचा संयुक्त प्रचार सांगता उत्साहात — प्रमोद नाना भानगिरे यांचे प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन

लाडक्या बहिणीची साथ एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना

कार्यक्रमास
प्रभाग ४१ मधील उमेदवार — प्रमोद नाना भानगिरे, सारिका ताई पवार, स्वाती ताई टकले, मच्छिंद्र दगडे. तसेच प्रभाग १६ मधील उमेदवार — शैलजा ताई भानगिरे, सागर राजे भोसले, अयोध्या ताई आंधळे हे सर्व उमेदवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रमोद नाना भानगिरे यांनी कार्यकर्ते व मतदारांना आवाहन केले की, शिवसेना शिंदे गटाचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी करा. विकास, स्थैर्य आणि जनहितासाठी हा विजय आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. प्रत्येक घरापर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवण्याचे आव्हान त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.
कार्यक्रमास शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने तसेच युवकांची लक्षणीय उपस्थिती होती. महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. उपस्थितांनी एकजुटीने प्रचार करून सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. हा संयुक्त प्रचार सांगता कार्यक्रम निवडणुकीच्या दृष्टीने निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.









