मोबाईल रिचार्ज संपल्यावर आउटगोइंग बंद, पण इनकमिंग कॉल का सुरू? – प्रशासन व सिमकार्ड कंपन्यांना अक्षय बहिरट पाटील यांचा सवाल!!!!!
पुणे : मोबाईल रिचार्जची वैधता संपल्यानंतर ग्राहकांची आउटगोइंग सेवा तत्काळ बंद केली जाते, मात्र इनकमिंग कॉल सेवा का बंद केली जात नाही? असा थेट सवाल प्रशासन तसेच सिमकार्ड कंपन्यांना अक्षय बहिरट पाटील यांनी उपस्थित केला आहे.
आज जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे दोन सिमकार्ड असतात. अनेक नागरिक एका सिमवर नियमित रिचार्ज करतात, तर दुसरे सिम केवळ इनकमिंग कॉलसाठी वापरतात. त्यामुळे रिचार्ज संपल्यानंतरही इनकमिंग कॉल सुरू राहतात. परंतु कंपन्यांनी जर रिचार्ज संपल्यावर इनकमिंग सेवा बंद केली, तर अनेक ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
नोकरीसाठीचे फोन, व्यवसायाशी संबंधित कॉल, तसेच कुटुंबीयांचे महत्त्वाचे संपर्क हे सर्व इनकमिंग कॉलवर अवलंबून असतात. त्यामुळे अचानक इनकमिंग सेवा बंद केल्यास नागरिकांना मोठा त्रास होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकांच्या हिताचा विचार करून स्पष्ट धोरण जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
अक्षय बहिरट पाटील हे पुणे शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस, तसेच पुणे जिल्हाध्यक्ष – युवक भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) आणि महाराष्ट्र औद्योगिक जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत सर्व मोबाईल कंपन्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.









