*प्रज्ञा विद्यालयात विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन*
- नवचैतन्य मित्र मंडळ संचलित प्रज्ञा प्राथमिक विद्यालय आदर्श नगर फुरसुंगी यांच्यावतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच बालिका दिनानिमित्त विविध कलागुण दर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केली . एकूण 21 नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये कोळीनृत्य, खंडोबाचा गोंधळ,वारकरी नृत्य, साउथ इंडियन नृत्य, विविध शैक्षणिक कृतीगीते, सावित्रीबाईंचा जीवनपट,पर्यावरण व सामाजिक संदेश देणारे नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साने गुरुजी शिक्षण संस्थेचे आदर्श शिक्षक श्री. दिलीप मोरे सर, नवचैतन्य मित्र मंडळ संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री. अशोक सुरवसे सर, संस्थेच्या संचालिका श्रीमती राजश्री कांबळे, सौ. मीनाक्षी सुरवसे, संचालक श्री. संगम गायकवाड, श्रीमती वर्षा वाघमारे, प्रज्ञा प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा ससाणे , विद्यालयातील पालक सदस्य व मोठ्या प्रमाणात सर्व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा ससाणे यांनी केले.यावेळी त्यांनी अभ्यासातून थोडा विरंगुळा देऊन आनंदी व उत्साही वातावरण निर्माण करणे तसेच सामाजिक एकोपावाढविण्यासाठी,सर्व घटकांना एकत्र आणून सहकार्य, शिस्त व एकात्मता जोपासण्यासाठी , विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अर्चना ताजणे, श्री. संतोष हिंगणे यांनी केले तर सौ. दिपाली आरडे यांनी सर्वांचे आभार मानले.
Views: 404









