विकास, महिला सक्षमीकरण आणि जलसंधारणावर भर – भाजपा उमेदवार दिव्या जगदाळे


पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार रंगात!!!!!

 

सासवड:(सोहम मेमन) पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका दिवसेंदिवस रंगतदार होत चालल्या आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपच्या उमेदवारांना स्थानिक मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोडीत येथे झालेल्या सभेत उमेदवार दिव्या गंगाराम जगदाळे यांनी विकासकामांचा स्पष्ट आराखडा मांडला.

 

यावेळी बोलताना त्यांनी आगामी काळात दोन गावांना जोडणारे रस्ते तयार करण्यात येणार असून, गावातील स्थानिक विकासकामे करताना महिला सक्षमीकरण हे मुख्य धोरण राहणार असल्याचे सांगितले. महिलांना स्वावलंबी बनवून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील. तसेच महिलांच्या आरोग्यासाठी गावागावात आरोग्य शिबिरे घेण्यात येणार असून, ग्रामीण भागातील कायमचा दुष्काळ हटवण्यासाठी व पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

दरम्यान, भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक फेऱ्या पूर्ण झाल्या असून कोडीत येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी प्रहार संघटनेच्या महिला अध्यक्षा सुरेखा ढवळे यांच्यासह कोडीत, चांबळी, भिवरी, बोपगाव, गराडे आदी परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

भाजपचे संजय कामठे यांनी सांगितले की, पुरंदरचा पश्चिम भाग पुण्याला लागून असून येथील शेतकरी मालाची ने-आण करण्यासाठी दररोज पुण्याला ये-जा करीत असतात. मात्र या भागातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. आता या निवडणुकीत सक्षम उमेदवार उभे असल्याने या प्रश्नांची सोडवणूक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुरक्षित व विकासाभिमुख उमेदवार म्हणून दिव्या जगदाळे आणि ललिता दिलीप कटके यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

जिल्हा परिषदेसाठी दिव्या गंगाराम जगदाळे तर पंचायत समितीसाठी ललिता दिलीप कटके या भाजपच्या उमेदवार असून, दोन्ही उमेदवार ग्रामीण समस्यांची जाण असलेले व विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मतदारांमध्ये बोलले जात आहे. स्थानिक प्रश्नांना हात घालत प्रत्यक्ष काम करणाऱ्या उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याने पुरंदर तालुक्यात निवडणुकीची लढत अधिकच चुरशीची होत असल्याचे चित्र आहे.

 


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!