खरात प्रकरण गाजत असताना ‘समर्थ क्रॉप केअर’च्या ५००० कोटींच्या प्रशांत गवळी घोटाळ्याकडे दुर्लक्ष का? शेतकरी आणि गोरगरीब जनता गुंतवणूक दाराची मागणी ?
हडपसर:.
एकीकडे देशात ‘खरात’ प्रकरणाची चर्चा रंगत असताना, दुसरीकडे पुण्यातील हडपसर परिसरातून पायमुळे पसरलेल्या ‘समर्थ क्रॉप केअर’ (Samarth Crop Care) कंपनीच्या कोट्यवधींच्या घोटाळ्याबाबत मात्र संशयास्पद शांतता दिसून येत आहे. या कंपनीचा मुख्य सूत्रधार प्रशांत गवळी याने सर्वसामान्य शेतकरी आणि गोरगरीब जनतेला जास्त परताव्याचे आमिष दाखवून त्यांची आयुष्यभराची पुंजी लुटल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
गुंतवणूक दुप्पट करण्याचे खोटे आमिष,.
प्रशांत गवळी याने मगरपट्टा सिटी परिसरात आपले मुख्य कार्यालय थाटले होते. शेतीमाल आणि विशेषतः शेती माल, निर्यात व्यवसायात गुंतवणुकीवर १० महिन्यांत पैसे दुप्पट करून ५ मुद्ल ५ नफा देण्याचे किंवा दरमहा १० टक्के परतावा देण्याचे प्रलोभन त्याने हजारो गुंतवणूकदारांना दाखवले. अनेक शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन, दागिने आणि घरातील बचत या कंपनीत गुंतवली होती.
व्याप्ती: प्राथमिक अंदाजानुसार हा घोटाळा १५ कोटींपासून ५००० कोटी रुपयांपर्यंत असू शकतो, ज्यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे ४५,००० गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे.
फसवणुकीची पद्धत: स्वतःला ‘मानद व्यापार आयुक्त’ असल्याचे सांगून गवळीने लोकांचा विश्वास संपादन केला. विश्वासार्हता वाढवण्यासाठी त्याने काही गुंतवणूकदारांना दुबईवारीवर देखील नेले होते.
कारवाई: गेल्या काही महिन्यांपासून परतावा मिळणे बंद झाल्याने गुंतवणूकदारांनी कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा वळवला होता. अखेर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) मुख्य आरोपी प्रशांत गवळी याला अटक केली आहे.
सामान्य जनतेचा सवाल: आमचा आवाज उठणार कधी?
खरात प्रकरणाला मिळणारी प्रसिद्धी पाहता, समर्थ क्रॉप केअरमुळे देशोधडीला लागलेल्या हजारो शेतकरी कुटुंबांच्या प्रश्नावर मात्र कुणीही बोलायला तयार नाही. गोरगरीब जनतेच्या या आर्थिक लुटीबाबत शासन आणि प्रशासन ठोस भूमिका घेणार का, आम्हाला न्याय मिळणार का ? असा संतप्त सवाल आता हडपसर परिसरातील नागरिक करत आहेत.
सध्या हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल असून, आर्थिक गुन्हे शाखा या महाघोटाळ्याचा अधिक तपास करत आहे









