निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून झाली मोठी चूक प्रभाग १६ मधील प्रकार


*हडपसर मुंढवा प्रभाग १६ मध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून उमेदवारावर अन्याय उमेदवार क्रमांकात गोंधळ*

हडपसर–मुंढवा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये निवडणूक प्रक्रियेदरम्यान गंभीर गोंधळ उघडकीस आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडून उमेदवार क्रमांक देताना झालेल्या चुकांमुळे संबंधित उमेदवारावर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.उमेदवारी अर्ज मंजूर झाल्यानंतर उमेदवाराला देण्यात येणाऱ्या क्रमांकात अचानक बदल करण्यात  आल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या गोंधळाचा थेट फटका संबंधित उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला  बसत असून प्रचार व मतदान प्रक्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या प्रकाराबाबत उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तात्काळ तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व उमेदवाराला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.दरम्यान, निवडणूक प्रक्रियेतील अशा चुका लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत असून, प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे


13
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!