सादिक कपूर मृत व्यक्तीच्या नावाआड आरोपी करतोय स्वतःचा बचाव!!!


**मृत व्यक्तीला बदनाम करण्याचे षडयंत्र?

खऱ्या आरोपींचा बचाव करण्यासाठी दिशाभूल करण्याचा आरोप**

पुणे — सादिक कपूर आत्महत्या प्रकरणात आता मृत व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप पुढे येत आहे. प्रकरणातील मुख्य आरोपींच्या बचावासाठी काही प्रभावशाली व्यक्ती जाणीवपूर्वक मृत सादिक कपूर यांच्यावरच संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे कुटुंबीय व सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

मृत सादिक कपूर यांच्या मुलाने सांगितले की, “वडिलांवर सतत मानसिक व आर्थिक दबाव टाकण्यात आला. आता आरोपींना वाचवण्यासाठी वडिलांनाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा आमच्या कुटुंबावर दुहेरी अन्याय आहे.”

या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आरोपी फारुख इनामदार यांचे नाव समोर आल्यानंतर, काही वृत्त व्यक्ती व समर्थकांकडून एकतर्फी माहिती पसरवली जात असून ती मृत व्यक्तीची बदनामी करणारी आहे, असा आरोप करण्यात येत आहे. यामागे तपासाची दिशा बदलणे आणि जनमत संभ्रमात टाकणे हा उद्देश असल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान, पोलीस तपास सुरू असून सुसाईड नोट, आर्थिक व्यवहार आणि साक्षीदारांचे जबाब तपासले जात आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत कोणालाही क्लीन चिट देऊ नये, अशी मागणी मृताच्या कुटुंबीयांनी केली आहे.

हे प्रकरण आता केवळ आत्महत्येपुरते मर्यादित न राहता, न्यायप्रक्रिया प्रभावित करण्याच्या कथित प्रयत्नांमुळे अधिक गंभीर बनले आहे. सत्य बाहेर यावे आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


13
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!