एक पाऊल विकासाकडे एकच ध्यास प्रभाग १६चा विकास


 

 

सामाजिक कार्यातून आदर्श निर्माण करणाऱ्या सौ. स्मिता  तुषार गायकवाड

 

हडपसर :

सामाजिक बांधिलकी जपत गोर-गरीब, गरजू व वंचित घटकांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या सौ. सीमा सुधाकर गायकवाड या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. सन २०१४ पासून त्यांनी समाजसेवेचा वसा स्वीकारत विविध उपक्रमांद्वारे समाजाला मदतीचा हात दिला आहे.

 

शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, गरिबांसाठी अन्नदान, वस्त्रदान, तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतकार्य अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात.

 

गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, गरजू रुग्णांना आर्थिक मदत, तसेच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे. त्यांच्या या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडून येत असून अनेक गरजू कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

 

कोरोना काळातही त्यांनी अन्नधान्य वाटप, औषधोपचारासाठी मदत आणि नागरिकांना मानसिक आधार देण्याचे काम केले. त्यांच्या कार्याची दखल घेत विविध सामाजिक संस्थांनी त्यांचा सन्मान केला आहे.

 

“समाजासाठी काहीतरी देणे हेच माझे कर्तव्य आहे,” अशी भावना व्यक्त करत सौ. स्मिता तुषार गायकवाड या भविष्यातही समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.


13
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!