“ही लढाई विचारांची आहे” – दिवे गराडे यांचे आवाहन; जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत कमळाला मतदान करण्याचे साद
पुणे | प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून प्रचाराला वेग आला असून, दिवे गराडे यांनी प्रसिद्ध केलेल्या संदेशातून मतदारांना स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य मतदारांना अनेकदा दबावाखाली मतदान करावे लागते, मात्र आता प्रथमच जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत निर्भयपणे, कोणत्याही दबावाशिवाय मतदान करण्याची संधी जनतेकडे आहे, असे या संदेशात नमूद करण्यात आले आहे.
ही निवडणूक कोणत्याही जातीपातीची नसून, सर्वसामान्य माणसाच्या न्याय व हक्कासाठीची आहे. ही केवळ निवडणूक नसून विचारांची लढाई असल्याचे ठासून सांगण्यात आले आहे.
“ही वेळ गप्प बसण्याची नाही, ही वेळ संभ्रमाची नाही आणि कोणाच्याही दबावाला बळी पडण्याची नाही,” असा स्पष्ट इशारा देत मतदारांनी आपला आदर्श ठरवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन दिवे गराडे यांनी केले असून, ग्रामीण विकास, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी भाजप ठामपणे उभी असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रचारामुळे ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापत असून, आगामी निवडणुकीत मतदार कोणता कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेआहे..










