भेकराई डेपो,कॉन्ट्रॅक्ट बेसवरील तोतया ट्रेनरकडून शासनाच्या वर्दीचा गैरवापर; वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोरच प्रकार


वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर शासनाची वर्दी घालणारा तोतया ट्रेनर; पी.एम.पी.एल भेकराई डेपोमध्ये गंभीर आरोप

पुणे :

पुणे महानगर परिवहन महामंडळ (पी.एम.पी.एल) अंतर्गत भेकराई नगर डेपोमध्ये कार्यरत असलेल्या एका कॉन्ट्रॅक्ट बेसवरील ट्रेनरवर शासनाची फसवणूक आणि नियमभंग केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. संबंधित ट्रेनर हा अधिकृत शासकीय कर्मचारी नसतानाही शासनाची वर्दी परिधान करून वावरत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा तोतया ट्रेनर डेपोमध्ये प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली काम करत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोरही शासकीय वर्दी घालून उपस्थित राहत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे, पेमेंटसंदर्भात तक्रारदाराला लिखित आश्वासन देण्यात आल्याचा आरोप असून, यामागे डेपो मॅनेजरचा आशीर्वाद असल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, कॉन्ट्रॅक्ट बेसवरील व्यक्तीने शासकीय अधिकार असल्याप्रमाणे वागणे, आदेश देणे आणि वर्दीचा वापर करणे हे पूर्णतः नियमबाह्य आहे. अशा प्रकारामुळे शासनाची आर्थिक फसवणूक होत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शासकीय वर्दीचा गैरवापर करणे हा गंभीर गुन्हा असून, संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांसह काही कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे. मात्र, या गंभीर आरोपांवर पी.एम.पी.एल प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दरम्यान, या घटनेमुळे पी.एम.पी.एल मधील कॉन्ट्रॅक्ट पद्धत, प्रशिक्षण व्यवस्था आणि प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेण्याची गरज व्यक्त केली जातआहे.


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!