वानवडी पोलिसांची मोठी कारवाई; ट्राफिक सिग्नल बॅटरी चोरट्यांची टोळी अटकेत!!!!


पुण्यात ट्राफिक सिग्नल बॅटरी चोरी करणारी टोळी वानवडी पोलिसांकडून जेरबंद

पुणे : पुणे शहरातील विविध ट्राफिक सिग्नल चौकांवरील ट्राफिक कंट्रोलर बॉक्समधील बॅटरी चोरी करणाऱ्या टोळीला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ६८ हजार रुपये किंमतीच्या ३४ बॅटऱ्या, एक रिक्षा व लोखंडी कटावणी असा एकूण १ लाख ६८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे दिपक अमोल कांबळे (वय ३२, रामटेकडी), चाँद उस्मान शेख (वय २८), विकास उर्फ टकल्या विजय माने (वय ३६, अरोरा टॉवर्सजवळ, फुटपाथवर, कॅम्प) आणि अली मुल्ला शेख (वय २७, भाग्योदयनगर, भैरवनाथ मंदिराजवळ, कोंढवा) अशी आहेत. सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

तपासादरम्यान आरोपींनी काळुबाई चौक, ए.एफ.एम.सी. चौक, रेस कोर्स चौक, बी.टी. कवडे चौक, शास्त्रीनगर, सांदलबाबा चौक, धोबी घाट चौक तसेच सिटीप्राईट/पुष्पमंगल चौक येथून ट्राफिक सिग्नलच्या बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली दिली आहे.

ही कारवाई पोलीस परिमंडळ ०५ च्या पोलीस उप-आयुक्त श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, वानवडी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त श्रीमती नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि गुन्हे निरीक्षक श्रीमती संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपास पथकात सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख तसेच पोलीस अंमलदार महेश गाढवे, दया शेगर, अतुल गायकवाड, अमोल पिलाणे, आशिष कांबळे, बालाजी वाघमारे, विठ्ठल चोरमले, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, अभिजित चव्हाण व अर्शद सय्यद यांचा समावेश होता.


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!