प्रभाग १६ मध्ये शैलजा ताई भानगिरे यांचे धनुष्यबाण चालणार मतदारांचा कौल


आकाशवाणी, अमर बाग व उत्कर्ष नगर परिसरात शिंदे गटाच्या शिवसेना उमेदवार शैलजा ताई भानगीरे यांचा जनसंपर्क दौरा

हडपसर : शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार शैलजा ताई भानगीरे यांनी आकाशवाणी, अमर बाग व उत्कर्ष नगर या परिसरात नागरिकांच्या भेटी घेतल्या. या वेळी त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या.स्थानिक नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन तसेच महिला सुरक्षा या प्रश्नांकडे शैलजा ताई यांचे लक्ष वेधले. या सर्व प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. “सामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. विकासकामांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे त्यांनी सांगितले.या जनसंपर्क दौऱ्यादरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांकडून शैलजा ताई भानगीरे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.


13
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!