पुरंदर उपसा व जनाई–शिरसाई योजनेवरील अडचणींसाठी उद्या शेतकरी सुसंवाद बैठक; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शेतकऱ्यांशी संवाद साधणार


पुरंदर उपसा व जनाई–शिरसाई योजनेवरील अडचणींसाठी उद्या शेतकरी सुसंवाद बैठक; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शेतकऱ्यांशी साधणार संवाद

पुरंदर :

पुरंदर उपसा जलसिंचन योजना तसेच जनाई–शिरसाई योजनेतील समस्या व अडचणी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री (पुरंदर उपसा जलसिंचन योजना मंत्री) मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील हे उद्या मंगळवार, दिनांक 04 फेब्रुवारी 2026 रोजी पुरंदर तालुक्यातील वाघापूर चौफुला येथे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

या शेतकरी सुसंवाद बैठकीस दौंडचे विद्यमान आमदार मा. श्री. राहुलदादा कुल, पुरंदरचे माजी आमदार मा. श्री. संजयजी जगताप, भाजप जिल्हाध्यक्ष मा. श्री. शेखरजी वढणे तसेच माजी आमदार मा. श्री. अशोकभाऊ टेकवडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या बैठकीत पुरंदर उपसा योजना व जनाई–शिरसाई योजनेअंतर्गत पाणीपुरवठा, अंमलबजावणीतील अडचणी, शेतकऱ्यांच्या तक्रारी व मागण्या यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार असून, शेतकऱ्यांच्या समस्या थेट ऐकून त्यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी उपसा योजना व जनाई–शिरसाई योजनेबाबतची निवेदने घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

🟢 स्थळ : अक्षय मंगल कार्यालय, वाघापूर चौफुला

🗓️ दिनांक : 04/02/2026

⏰ वेळ : सकाळी 9.30 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत

ही शेतकरी सुसंवाद बैठक भारतीय जनता पार्टी, पुरंदर तालुका यांच्या वतीने आयोजित करण्यातआली आहे.


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!