भाजप पुरंदर पश्चिम मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर!!!!!
पुरंदर तालुक्यातील (पश्चिम) भारतीय जनता पार्टीची नवीन मंडळ कार्यकारिणी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली आहे. दिनांक 07 फेब्रुवारी 2025 रोजी ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली. संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध आघाड्या व विभागांवर अनुभवी व कार्यक्षम पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष, सचिव तसेच विविध आघाड्यांचे अध्यक्ष यांचा समावेश असून सर्व पदाधिकाऱ्यांवर संघटन वाढवण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भाजप पुरंदर पश्चिम मंडळ कार्यकारिणीतील पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत :
उपाध्यक्ष:
1. सुदर्शन सुदाम कुदळे
2. अक्षय गणपत उरसळ
3. विकास बबन इंदलकर
सचिव 4) संभाजी वसंत फडतरे
5) महेंद्र विलास कोलते
6) नानासो शेंडकर
महिला मोर्चा अध्यक्ष 7) मंजूषाताई गोपाळ गायकवाड
सोशल मीडिया आघाडी अध्यक्ष 8) सुरज काळूराम गदादे
पंचायतराज व ग्रामविकास आघाडी अध्यक्ष 9) राजू जगन्नाथ कोलते
ज्येष्ठ नागरिक आघाडी अध्यक्ष 10) महादेव नाना लक्ष्मण टिळेकर
आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष 11) बाळासाहेब आनंद भैरट
कामगार आघाडी अध्यक्ष 12) प्रविण रामचंद्र भोसले
उद्योग आघाडी अध्यक्ष 13) स्वप्नील प्रभाकर काळे
व्यापार आघाडी अध्यक्ष 14) एकनाथ बाजीराव यादव
भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष 15) श्री देविदास गुणाजी नाझीरकर
कायदा आघाडी अध्यक्ष 16) अॅड. अनिकेत विजय भगत
शिक्षक आघाडी अध्यक्ष 17) भानुदास खंडू कुंभारकर
पदवीधर आघाडी अध्यक्ष 18) धैर्यशील उत्तमराव शिंदे
सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष 19) तुषार पंढरीनाथ ढुमे
आय.टी. सेल अध्यक्ष 20) श्री साईनाथ संभाजी कोलते वाहतूक आघाडी अध्यक्ष 21) संदेश बाळासाहेब कुंजीर
ही कार्यकारिणी मा. संदीप बबन कटके पाटील, अध्यक्ष – भाजप पुरंदर तालुका (पश्चिम) यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.शेखर अशोक वढणे, अध्यक्ष – भाजप पुणे जिल्हा (दक्षिण) यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीमुळे पुरंदर तालुक्यात भाजपचे संघटन अधिक बळकट होईल व आगामी काळात पक्षाचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवले जाईल, असा विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.









