पुरंदर उपसा योजनेसाठी १०० कोटींची घोषणा; शेतकऱ्यांना दिलासा ,शेतकरी संवाद बैठकीत मोठा निर्णय; विखे पाटील यांचे आश्वासन


शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थेट संवाद; विखे पाटील, राहुल कुल, संजय जगताप व अशोक टेकवडे यांचे ठोस आश्वासन!!!!

वाघापूर चौफुला:

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित शेतकरी संवाद बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व तक्रारी थेट ऐकून घेण्यात आल्या.

या कार्यक्रमात आमदार राहुल कुल, माजी आमदार संजयजी जगताप व माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी पुरंदर उपसा सिंचन योजना व जनाई–शिरसाई योजनेतील अडचणी, पाणीपुरवठा, सिंचन समस्या याबाबत शेतकऱ्यांकडून तक्रार अर्ज स्वीकारण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर योग्य व तातडीच्या उपाययोजना करण्यात येतील, असे ठोस आश्वासन उपस्थित मान्यवरांनी दिले.

कार्यक्रमात बोलताना जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुरंदर उपसा सिंचन प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची घोषणा करत शेतकरी हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

या प्रसंगी उपस्थित नेत्यांनी जनतेला आवाहन करत आगामी निवडणुकीत सर्व भाजप उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन केले.

“तुमची आमची… भाजपा सर्वांची!” असा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप झाला.


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!