मध्यरात्री फटाका सायलेन्सरचा आवाज करत दहशत माजवणारे दुचाकीस्वार पोलिसांच्या जाळ्यात; ११ गाड्या जप्त, गॅरेज चालकांवरही कारवाई!!


पुणे (काळे पडळ)

काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत (कडनगर चौक, न्याती चौक, रहेस्टा विस्टा चौक, उंड्री, महंमदवाडी परिसरात) मध्यरात्रीच्या सुमारास फटाका बुलेट सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज काढून नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या टवाळखोर दुचाकीस्वारांवर काळेपडळ पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ दुचाकी जप्त केल्या असून आरोपींवर विविध गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

 

गुन्हा दाखल व कलमे: गु.र.नं. ३७५/२०२६ भा.न्या.सं. कलम २८१, २९२ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १८२ (अ), १९४ (एफ), १९८, १७७, क्रिमिनल लॉ अ‍ॅमेंडमेंट कलम ७, केंद्रीय मोटार वाहन अधिनियम कलम १२० प्रमाणे गुन्हा नोंदवला गेला आहे.

आरोपींची नावे (१५ जण): सुमीत वसंत सगट, शिवम दिपक जाधव, आर्यन जगन्नाथ गायकवाड, सार्थक प्रदिप अल्हाट, राज उर्फ यश सागर रणदिवे, अमन, तुषार नितीन गायकवाड, धिरज लक्ष्मण गेंजगे, आयान शेख, प्रेम गायकवाड, दयानंद सुतार, वरद सनी तोडकर, दिनेश रितेश लांबोटे, राजेंद्र सतिश वाघमोडे, रवि किसन लोखंडे.

जप्त वाहने (११ गाड्या): MH 49 S 8356, विना नंबरप्लेट बुलेट, MH 14 FN 0639, MH 12 LF 0407, MH 12 RC 3677, बर्गमॅन MH 12 YG 0417, MH 12 MJ 1821, MH 12 JX 2227, MH 12 GP 3450, MH 12 JB 5476, MH 12 KZ 7082.

गॅरेज चालकांवर कारवाई: मॉडीफाईड फटाका सायलेन्सर बसवून देणारे गॅरेज चालक युसूफ फारुख शेख, निखील फुलाजी सरडे व रोहन बबलू महापुरे यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे व जप्त केलेले सायलेन्सर नष्ट करण्यात आले आहेत.

मार्गदर्शन व कामगिरी: पोलीस उप आयुक्त जीवन बेनिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आण्णासो बाबर आणि तपास पथकाचे विलास सुतार – सहायक पोलीस निरीक्षक (सहा. पो. नि.)  राजस शेख – सहायक पोलीस उपनिरीक्षक (सपोफौ)  प्रविण काळभोर – पोलीस हवालदार (पोहवा)  अमोल फडतरे,  निलेश देसाई,  दाऊद सय्यद , प्रतिक लाहीगुडे,  शाहीद शेख  ,महादेव शिंदे – पोलीस अंमलदार (पोअं./पोकाँ)  गिरीराज जगदाळे – पोलीस अंमलदार (पोअं./पोकाँ)  अतुल पंधरकर  नितीन ढोले  विशाल ठोंबरे  सद्दाम तांबोळी  प्रदीप बेडीस्कर  लक्ष्मण काळेही प्रशंसनीय कारवाई केली.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!