पुणे : वाढती गुन्हेगारी, महागाई, ड्रग्स माफियांचा वाढता प्रभाव, महिला अत्याचार, शहरातील भीषण वाहतूक कोंडी तसेच फसवे कृषी धोरण या विविध प्रश्नांवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने शहर कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी महायुती सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देत आंदोलनात्मक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली. “जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा निषेध असो” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
या आंदोलनाचे नेतृत्व शैलेंद्र (आबा) बेल्हेकर यांनी केले. त्यांनी सांगितले की, राज्यात गुन्हेगारी आणि महिला अत्याचाराच्या घटना वाढत असून, शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नाही. तसेच शहरातील वाहतूक कोंडी आणि महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. सरकारने तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या वेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔥









