काळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी; सराईत आरोपीकडून ४ दुचाकी जप्त, २.८० लाखांचा मुद्देमाल हस्


काळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी; सराईत आरोपीकडून चोरीस गेलेल्या ४ दुचाकी जप्त, २.८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. ५०४/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल असून, या गुन्ह्यातील आरोपी आब्बास उर्फ कलिंगड याचा शोध घेण्याचे काम काळेपडळ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार शाहीद शेख व अतुल पंधरकर करीत होते. त्यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता, आरोपी हा चोरी केलेल्या दुचाकीसह मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतल्यानंतर आरोपीचे नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव आब्बास उर्फ कालिंगड सय्यद पठाण, वय १९ वर्षे, रा. गल्ली नं. १९, शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे असे सांगितले. पुढील तपासकामी त्यास काळेपडळ पोलीस ठाणे येथे आणून अधिक चौकशी केली असता, नमूद गुन्हा त्याने केल्याची कबुली दिली. तसेच यापूर्वीही त्याने वेगवेगळ्या पोलीस ठाणे हद्दीतून अशा प्रकारे दुचाकी वाहने चोरी केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले.

आरोपीकडून चोरीस गेलेल्या दुचाकी वाहने त्याच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आली असून त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :

हस्तगत दुचाकींचा तपशील :

काळेपडळ पोलीस ठाणे – गु.रजि.क्र. ५०४/२०२४

१ स्प्लेंडर प्लस दुचाकी, क्र. एम.एच. १२ एन.जी. ६४६६

२ लष्कर पोलीस ठाणे – गु.रजि.क्र. २०१/२०२४

३ स्प्लेंडर दुचाकी, क्र. एम.एच. १२ टी ई ३३९७

हडपसर पोलीस ठाणे – गु.रजि.क्र. ६५४/२०२४

४ होंडा फॅशन प्रो दुचाकी, क्र. एम.एच. ०१ बी.यु. १२५९

हडपसर पोलीस ठाणे – गु.रजि.क्र. ९३६/२०२४

होंडा कंपनीची शाईन दुचाकी, क्र. एम.एच. १० सीसी ६५८४

असा एकूण रु. २,८०,०००/- किंमतीचा मुद्देमाल आरोपी आब्बास उर्फ कलिंगड याच्याकडून हस्तगत करून वरील पोलीस ठाण्यांतील नोंद असलेले गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.

ही कारवाई डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६ यांच्या मार्गदर्शनाखाली, अतुलकुमार नवागिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर, तसेच मानसींग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.

सदर कामगिरी पोलीस उप निरीक्षक विनायक गुरव, तसेच पोलीस अंमलदार प्रविण काळकर, दाऊद सय्यद, प्रतीक लाहीभुडे, किशोर पोते, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सदाम तांबोळी व महादेव शिंदे यांच्या पथकाने केली असून ही कामगिरी प्रशंसनीय आहे.


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!