पुण्यात गुन्हे शाखा युनिट-२ ची मोठी कारवाई; जनता वसाहतीतून १२ धारदार शस्त्रांसह चौघांना घेतले ताब्यात
पुणे:
पुणे शहर पोलीस गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे कारवाई करत १२ धारदार लोखंडी शस्त्रांसह एका तरुणाला व त्याच्या ३ अल्पवयीन (विधीसंघर्षित) साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व महेश मंडलिक यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली. राम मंदिराच्या पाठीमागे, गल्ली नं. ७७, जनता वसाहत येथे गौरव कांबळे हा त्याच्या ३ मित्रांसह बेकायदेशीरपणे धारदार शस्त्रे बाळगून थांबला आहे.
सदर बातमीची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट-२ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी सापळा रचून कारवाई केली.
८,५०० रुपयांची १२ धारदार शस्त्रे जप्त….
या कारवाईत गौरव राजू कांबळे (वय १८ वर्षे, रा. जनता वसाहत, पर्वती, पुणे) याच्यासह ३ विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सुमारे ८,५०० रुपये किमतीची एकूण १२ धारदार लोखंडी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलमांनुसार गुन्हा (गुन्हा रजि. क्र. २५३/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, म.पो.उप-निरीक्षक तेजश्री, उज्वल मोकाशी, संदीप शिर्के, विजयकुमार पवार, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे, नागनाथ राख, शंकर नेवसे, आशिष यादव, शंकर कुंभार, विजय पवार, योगेश मांढरे व विनायक वगारे यांच्या पथकाने केली.








