येवलेवाडीतून चोरीला गेलेली मोपेड हडपसरमध्ये जप्त; गुन्हे शाखेच्या पथक-२ कडून विधीसंघर्षित बालक पोलिसांच्या स्वाधीन!!


पुणे: दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-२ कडून बर्गमन मोपेड चोरीचा गुन्हा उघडकीस; १७ वर्षीय विधीसंघर्षित बालक ताब्यात.

पुणे (विशेष प्रतिनिधी):पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-२ ने धडक कारवाई करत येवलेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली बर्गमन मोपेड हस्तगत केली आहे. या कारवाईत एका १७ वर्षीय विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले असून ५० हजार रुपये किमतीची मोपेड जप्त करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-२ चे पोलीस उपनिरीक्षक संतोष तानवडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास चव्हाण, ए.एस.आय. कुरळे, पोलीस हवालदार परेश सावंत आणि पोलीस अंमलदार प्रफुल मोरे हे हडपसर परिसरात गस्त घालत होते. गस्तीदरम्यान पोलीस हवालदार परेश सावंत व प्रफुल मोरे यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, डीपी रोडवरील ‘हॉटेल दुर्गा’जवळ (हडपसर) एक व्यक्ती चोरीच्या गाडीसह थांबली आहे.मिळालेल्या बातमीच्या आधारे पथकाने तातडीने हॉटेल दुर्गा परिसरात धाड टाकून विना नंबरप्लेटच्या काळ्या रंगाच्या मोपेडसह थांबलेल्या एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता तो १७ वर्षांचा विधीसंघर्षित बालक (रा. कात्रज-कोंढवा रोड, पुणे) असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाची सुझुकी बर्गमन मोपेड (क्र. MH 12 UL 6606) बद्दल अधिक तपास केला असता, ही मोपेड येवलेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर १२६/२०२६ (BNS कलम ३०३(२)) अंतर्गत चोरीला गेल्याचे उघड झाले. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता सदर बालक मोपेड चोरी करताना दिसून आला होता.सुमारे ५०,००० रुपये किमतीची ही बर्गमन मोपेड जप्त करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी विधीसंघर्षित बालकाला त्याच्या पालकांसह येवलेवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही यशस्वी कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक-२ च्या कर्मचाऱ्यांनी केली.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!