शिक्षक कॉलनीत घाणीचे साम्राज्य; हडपसर मांजरी क्षेत्रीय महापालिका प्रशासन झोपेत, नागरिक संतप्त”


शिक्षक कॉलनीत घाणीचे साम्राज्य; पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पुणे : साडेसतरा नळी अमनोरा लगत असलेल्या शिक्षक कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्याने दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पालिका कर्मचारी आपल्या कामात दिरंगाई करत आहेत का? संबंधित अधिकारी सक्षम नाहीत का? किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे का? असे अनेक प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. वारंवार तक्रारी करूनही परिसरातील कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कचऱ्यामुळे परिसरात डास, माशा व भटक्या जनावरांचा त्रास वाढला असून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

यासंदर्भात क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री. अमोल नाना यशवंत तुपे यांनी हडपसर मांजरी महानगरपालिकेला इशारा दिला आहे. “तात्काळ या भागातील कचरा उचलण्यात आला नाही तर क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने परिसरातील संपूर्ण कचरा प्रायव्हेट डंपरमध्ये भरून हडपसर मांजरी  महानगरपालिकेच्या आवारात आणून टाकण्यात येईल,” असा इशारा क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा.अमोल नाना तुपे त्यांनी दिला.

नागरिकांनी तातडीने स्वच्छता मोहीम राबवून नियमित कचरा व्यवस्थापन करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.


13
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!