हडपसरमध्ये रेल्वे अपघातात व्यक्तीचा मृत्यू; डॉ. बच्चुसिंग टाक यांनी मानवतेच्या नात्याने मदत!!!!


रेल्वे अपघातात मृत्यू; डॉ. बच्चुसिंग टाक व सहकाऱ्यांची मानवतेच्या भावनेतून मदत!!!!!

पुणे : हडपसर परिसरातील साडे १७ नळी रेल्वे गेटजवळ २ मार्च २०२६ रोजी रेल्वे अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते डॉ. बच्चुसिंग गुरुमुकसिंग टाक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मानवतेच्या भावनेतून मदतकार्य केले.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस व स्थानिक नागरिकांकडून डॉ. टाक यांना अपघाताबाबत फोनवरून माहिती देण्यात आली. माहिती मिळताच त्यांनी आपले सहकारी भारत ढगे यांच्यासह तत्काळ घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर रेल्वेची धडक लागल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. मृतदेहाचे अवशेष वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले होते. यावेळी डॉ. बच्चुसिंग टाक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक मृतदेहाचे अवशेष गोळा करून रुग्णवाहिकेद्वारे ससून रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली.

या घटनेत पोलिस प्रशासन व नागरिकांना मदत करत मानवतेच्या नात्याने मदतीचा हात पुढे केल्याबद्दल डॉ. टाक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!