उरुळी कांचन : बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा; विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत !!!! उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर महाविद्यालय येथे आज दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त माननीय महादेवराव कांचन, विद्यालयाचे प्राचार्य भोसले सर तसेच विभाग प्रमुख ठाकरे सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की, परीक्षा हा जीवनातील महत्त्वाचा टप्पा असून ती आत्मविश्वासाने, शांतपणे व योग्य तयारीनिशी द्यावी. तणाव न घेता सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात व सकारात्मक वातावरणात संपन्न झाला.















