अजित दादा पवार यांच्या निधनामुळे सुनील दादा बनकर यांनी वाढदिवस साजरा केला नाही; प्रभाग १६ मध्ये सार्वजनिक कार्यक्रम न करण्याचे आवाहन
हडपसर
:
अजित दादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मा. महापौर वैशाली ताई बनकर यांचे पती व मा. नगरसेवक सुनील दादा बनकर यांनी आपला वाढदिवस कोणताही उत्सव न करता साजरा न करण्याचा निर्णय घेतला.
वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम, सत्कार अथवा जल्लोष न करता त्यांनी अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. याचबरोबर त्यांनी प्रभाग क्रमांक १६ मधील सर्व नागरिक, कार्यकर्ते व मंडळांना आवाहन केले की या शोककाळात कोणीही सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव किंवा जल्लोषाचे आयोजन करू नये.
समाजामध्ये दुःखाची भावना असताना आनंदोत्सव टाळणे हे सामाजिक भानाचे लक्षण असून, सुनील दादा बनकर यांच्या या निर्णयाचे नागरिक व विविध स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे संवेदनशील आणि जबाबदार नेतृत्वाचे दर्शन घडल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.









