गराडे, चांबळी, सोमुडी, थापेवाडी, कोडीत, भिवरी परिसरात दिव्या ताई जगदाळे यांना जनतेचा वाढता पाठिंबा; कमळाला साथ देण्याचा निर्धार!!!!!
दिवे–गराडे :
दिवे–गराडे जिल्हा परिषद गटामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्या ताई गंगाराम जगदाळे यांना गराडे, चांबळी, सोमुडी
, थापेवाडी, कोडीत आणि भिवरी या गावांमधील जनतेचा वाढता आणि उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. “जनतेचा एक विचार, विकासाचा एक निर्धार” या भूमिकेसह नागरिक मोठ्या संख्येने दिव्या ताई जगदाळे यांच्या पाठीशी उभे राहत असून कमळ चिन्हाला साथ देण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, दिवे–गराडे जिल्हा परिषद गटामध्ये जनतेच्या प्रश्नांना थेट उत्तर देणारा आणि विकासाला दिशा देणारा चेहरा म्हणून दिव्या ताई जगदाळे ओळखल्या जात आहेत. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
गावोगावी घेतल्या जाणाऱ्या भेटी, संवाद आणि प्रचारादरम्यान महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळत असून “या वेळेस परिवर्तनासाठी कमळालाच मत” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. दिव्या ताई जगदाळे यांनीही “हा पाठिंबा म्हणजे माझ्यासाठी जबाबदारी असून, निवडून आल्यानंतर प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार,” असा विश्वास जनतेला दिला आहे.
एकूणच दिवे–गराडे जिल्हा परिषद गटात कमळ चिन्हाला मिळणारा वाढता पाठिंबा आणि दिव्या ताई जगदाळे यांचे जनतेशी असलेले नाते आगामी निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









