फुरसुंगीच्या प्रज्ञा विद्यालयात प्रजासत्ताक दिनाचा दिमाख; विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी ‘आदर्श नगर’ भारावले!
फुरसुंगी येथील आदर्श नगर भागातील नवचैतन्य मित्र मंडळ संचलित प्रज्ञा शिशु विहार, प्रज्ञा प्राथमिक विद्यालय व रमणलाल शहा माध्यमिक विद्यालय येथे भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि देशप्रेमी वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्ष श्री.अशोक सुरवसे व उपाध्यक्ष सौ.सत्यभामा जवंजाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि शिस्तबद्ध कवायतींनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले तालबद्ध कवायत. इयत्ता ८ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर शिस्तबद्ध कवायत केली.
इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी विविध साहित्यांचा वापर करत आकर्षक कवायती सादर केल्या.
बालवाडीच्या चिमुकल्यांनी आपल्या नृत्यातून सर्वांना मंत्रमुग्ध केले, तर मोठ्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा संदेश देणारी नृत्ये सादर केली.
बालवाडीपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून राष्ट्राप्रती असलेला आदर व्यक्त केला.
या सोहळ्याला फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्ष श्री. संतोष सरोदे आणि उपनगराध्यक्ष ॲड. ओंकार कामठे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी नगरसेवक श्री. सचिन देवकाते, श्री. गिरीश ढोरे, श्री. सचिन भाऊ हरपळे, नगरसेविका श्रीमती उषाताई ढोरे, सौ. स्नेहाताई हरपळे आणि सौ. स्नेहल जवंजाळ यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक सुरवसे, श्री. संगम गायकवाड, श्री. दामोदर शिरसाट, श्री. सदाशिव सुरवसे यांच्यासह संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. सत्यभामा जवंजाळ, संचालिका सौ. मीनाक्षी सुरवसे, श्रीमती राजश्री कांबळे, श्रीमती वर्षा वाघमारे आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संविधान शपथ व कॉपीमुक्त परीक्षेची शपथ घेण्यात आली. तसेच श्री.सचिन शितोळेदेशमुख यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रज्ञा प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा ससाणे
यांनी केले. सूत्रसंचालन सौ. अर्चना ताजने व सौ. रुपाली नेवसे यांनी अतिशय खुमासदार पद्धतीने केले. शेवटी रमणलाल शहा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. कविता बडेकर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रज्ञा शिशु विहारच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली नाईक व सर्व शिक्षक वृंदाने विशेष सहकार्य केले.










