५० दिवे–गराडे जिल्हा परिषद क्षेत्रात भाजपा मजबूत स्थितीत…


दिवे–गराडे :

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवे–गराडे परिसरातील गावागावात आणि वाड्या-वस्त्यांत भारतीय जनता पार्टीच्या उच्चशिक्षित उमेदवार दिव्या ताई जगदाळे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. घरभेटी, चौकसभा आणि थेट जनसंवादामुळे त्यांना सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दिव्या ताई जगदाळे या अभ्यासू व विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखल्या जात असून, त्यांच्या प्रचारात रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवक रोजगार व शेतकरी हित हे प्रमुख मुद्दे मांडले जात आहेत. त्यांच्या स्पष्ट आणि मुद्देसूद मांडणीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वास वाढताना दिसत आहे.

विशेषतः वाड्या-वस्त्यांमधील नागरिकांनी आपल्या मूलभूत प्रश्नांसाठी थेट संवाद साधल्याने समाधान व्यक्त केले असून, “काम करणारे, शिकलेले नेतृत्व मिळावे,” अशी भावना मतदारांमध्ये व्यक्त होत आहे.

भाजप कार्यकर्त्यांनी प्रचार अधिक जोमाने हाती घेतला असून, कमळाच्या चिन्हाला मत देण्यासाठी गावागावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूणच दिवे–गराडे परिसरात दिव्या ताई जगदाळे या प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!