मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप; काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर रंगेहाथ पकडल्याचा दावा
पुणे (वानवडी) :
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यावर करण्यात आला आहे. वानवडी परिसरात स्थानिक नागरिकांनी व राजकीय कार्यकर्त्यांनी शिवरकर यांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडल्याचा दावा केला आहे.
या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. नागरिकांनी थेट जाब विचारत निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही तीव्र संताप व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली.
घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत संबंधित प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे. निवडणूक काळात अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले
आहे









