अंमली पदार्थ विरोधी पथक–२, गुन्हे शाखा, पुणे शहर


 

 

 

पुणे महानगरपालिका निवडणूक–२०२५ च्या अनुषंगाने पुणे शहर आयुक्तालय हद्दीत अंमली पदार्थांच्या गैरव्यवहारास प्रतिबंध घालण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक–२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्याकडून प्रभावी कारवाई करण्यात येत आहे.

 

दिनांक ८/१/२०२६— रोजी पोलिस अंमलदार संदीप देवकाते यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे चंदननगर परिसरात सापळा रचून कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत रत्ननाथ मोहननाथ योगी उर्फ महाराज, वय —२३—, रा. सोपान नगर, वडगांव शेरी, पुणे (मूळ रा. राजस्थान) यास ताब्यात घेण्यात आले.

 

आरोपीकडून मेफेड्रॉन (एम.डी.) अमली पदार्थ १२० ग्रॅम ७७ मिलीग्रॅम, अंदाजे किंमत ₹२५,००,०००/-, तसेच इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, अँड्रॉईड मोबाईल फोन व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

सदर आरोपी चंदननगर परिसरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची विक्री करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाणे गु.र.नं. ११/२०२५ अन्वये एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क), २१(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. अपर पोलीस आयुक्त, मा. उप पोलीस आयुक्त गुन्हे शाखा व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक–२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे


13
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!