फारूख इनामदारांना जामीन मिळताच समर्थकांचा जल्लोष; रस्ता अडवून घोषणाबाजी, फटाके वाजवून कायदा धाब्यावर


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फारूक इनामदार यांना दोन दिवसा चा जामीन मिळताच जल्लोष; रस्ता अडवून घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी!!!!!!

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते फारूक इनामदार यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर होताच त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. जामीन मिळाल्याच्या आनंदात समर्थकांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली तसेच फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

या वेळी काही काळासाठी मुख्य रस्ता अडवण्यात आला, त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता अडवणे, परवानगीशिवाय जमाव जमवणे व फटाके वाजवणे हे कायद्याचे उल्लंघन ठरत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


13
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!