हडपसर : फारूक यासीन इनामदार यांना संबंधित प्रकरणात न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून, कोर्टाने त्यांना प्रचारा साठी दोन दिवसचा जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी सुनावणीअंती न्यायालयाने अटी व शर्तींच्या अधीन राहून जामीन देण्याचा आदेश दिला. पुढील तपास व न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहणार आहे.आत्महत्या प्रकरणातील चिठ्ठीत नाव आल्याने अटकेत असलेल्या फारुख यासीन इनामदार यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. निवडणूक प्रचारासाठी न्यायालयाकडून त्यांना दोन दिवसांचा तात्पुरता (सशर्त) जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाने घालून दिलेल्या अटींच्या अधीन राहून हा जामीन देण्यात आला असून, प्रकरणातील पुढील सुनावणी व तपास प्रक्रिया सुरू राहणार आहे.
Views: 218









