प्रभाग 41 च्या शिंदे गटाचे उमेदवारावर अज्ञानलोकांन कडून दगड फेक उमेदवार सौ.सारिका ताई जखमी


प्रभाग ४१ : शिंदे गटाचे उमेदवार सारिका ताई यांच्यावर अज्ञातांकडून दगडफेक, किरकोळ जखमी

 

हडपसर: प्रभाग क्रमांक ४१ मधील शिंदे गटाचे  उमेदवार सारिका ताई यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सारिका ताई यांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने मोठी इजा टळली आहे.घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी सारिका ताई यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.या प्रकरणी अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासणी व पुढील तपास सुरू आहे. निवडणूक काळात उमेदवारांवर होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला जर उमेदवार सुरक्षित नाही तर जनतेचे काय? दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.दरम्यान, या घटनेचा शिंदे गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला जात असून शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


13
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!