फुरसुंगीत कथित डोडाचुरा प्रकरण; पान शॉपच्या चौकशीची नागरिकांची मागणी !!


फुरसुंगीत पान शॉपवर गंभीर आरोप; पानात कथित ‘डोडाचुरा’ मिसळून विक्रीचा संशय, चौकशीची मागणी!!

 

फुरसुंगी परिसरातील शिवशंभो पान शॉपवर पानामध्ये कथितपणे डोडाचुरा (मादक पदार्थ) मिसळून विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पान शॉपमध्ये काही ग्राहकांना कथितपणे अमली पदार्थाचा अंश असलेला पान मसाला किंवा डोडाचुरा मिसळून पान दिले जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या आरोपांमुळे विशेषतः तरुण पिढी नशेच्या विळख्यात अडकण्याची भीती व्यक्त केली जात असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक रहिवासी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासन तसेच अन्न व औषध प्रशासन (FDA) यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित दुकानातील नमुने तपासावेत, दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी आणि परिसरातील अमली पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीवर कठोर नियंत्रण आणावे, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!