दिवे घाटात फुरसुंगी पोलिसांचा थरारक सापळा; १ लाखाचे दुर्मिळ मांडूळ जप्त, सातारा जिल्ह्यातील दोघे गजाआड!


पुणे (विशेष प्रतिनिधी):

पुण्यातील फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वन्यजीव तस्करांविरुद्ध पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या आणि वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अत्यंत संरक्षित मानल्या जाणाऱ्या दुर्मिळ ‘मांडूळ’ (Red Sand Boa) या सापाची बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना फुरसुंगी पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या धडक कारवाईत सुमारे १ लाख रुपये किमतीचे, १ किलो वजनाचे व ४५ इंच लांबीचे जिवंत मांडूळ जप्त करण्यात आले आहे.

 

दिनांक २२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वडकीनाला (ता. हवेली, जि. पुणे) येथे दोन तरुण दुर्मिळ मांडूळ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची अत्यंत गोपनीय माहिती फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळाली होती.

माहितीची खातरजमा होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी जलद हालचाली करत चारी बाजूंनी चोख सापळा रचला. संशयित तरुण ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले.

झडतीत सापडला ४५ इंचाचा जिवंत साप 🐍

संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या सॅक बॅगेची बारकाईने झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान बॅगेमध्ये तब्बल ४५ इंच लांबीचे जिवंत, तपकिरी रंगाचे मांडूळ आढळून आले. वन्यजीव बाळगण्याचा अथवा त्याची विक्री करण्याचा कोणताही वैध परवाना किंवा कागदपत्रे त्यांच्याकडे नसल्याचे तपासात निष्पन्न झाले.

अटक करण्यात आलेले आरोपी १)प्रथमेश सुरेश चव्हाण (वय १९ वर्षे, रा. जगतापनगर, सोनके, ता. कोरेगाव, जि. सातारा) २)शिवराज अनिल भोईटे (वय २१ वर्षे, रा. वाघोली, भोईटे वस्ती, ता. कोरेगाव, जि. सातारा)

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

दुर्मिळ मांडूळ: १ किलो वजन, ४५ इंच लांबी (अंदाजे बाजारमूल्य: ₹१,००,०००/-)काळ्या रंगाची सॅक बॅग

कडक कायदेशीर कारवाई‌ कोणताही परवाना नसताना मांडूळासारख्या दुर्मिळ वन्यजीवाची तस्करी व विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपींवर वन्यजीव (प्राणी) संरक्षण अधिनियम, १९७२ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शंभूराज जाधव करत आहेत.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!