कोंढवा: हज-उमराह यात्रेच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; अल खलिफा कंपनीच्या संचालकांविरोधात MPID अंतर्गत गुन्हा दाखल!


हज-उमराह यात्रेच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; अल खलिफा टूर्स अँड ट्रॅव्हल्सविरोधात कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल

 

पुणे.

हज आणि उमराह यात्रेच्या नावाखाली नागरिकांकडून लाखो रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी अल खलिफा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या संचालकांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, FIR क्रमांक ०३८० अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१६(२), ३१६(५), ३१८(४), ६१(२) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण अधिनियम १९९९ (MPID Act) कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

या प्रकरणात अमीर सरदार शेख, मिस्बा अमीर शेख, साबीर रियाझ शेख व इतर आरोपींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

हा गुन्हा १९ मार्च २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत घडल्याचे FIR मध्ये नमूद करण्यात आले आहे.

 

पीडित नागरिकांच्या शिष्टमंडळाने अ‍ॅड. तोसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपायुक्त विवेक मसाल यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) गुन्हा दाखल करण्यात आला.

 

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी हज आणि उमराह यात्रेसाठी आकर्षक आश्वासने देत अनेक निष्पाप नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. मात्र, यात्रेसंदर्भातील आश्वासित सुविधा न देता तसेच चुकीची माहिती देऊन नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

 

अ‍ॅड. तोसिफ शेख यांनी सर्व पीडित नागरिकांना पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार व जबाब नोंदविण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आरोपींविरोधात अधिक कठोर कायदेशीर कारवाई होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

सदर प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!