मांजरी बु. परिसरात ड्रग्स माफियांचा भांडाफोड; पान टपऱ्यांवर ड्रग्जयुक्त पानांची विक्री – शिवराज आप्पा घुले यांचा खळबळजनक आरोप!!!!!


मांजरी (प्रतिनिधी):

मांजरी बु., महादेवनगर, केशवनगर तसेच हडपसर परिसरात काही पान टपऱ्यांवर ड्रग्जयुक्त पानांची विक्री होत असल्याचा गंभीर आरोप माजी सरपंच शिवराज आप्पा घुले पाटील केला आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेकडो तरुण व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

शिवराजअप्पा घुले यांनी सांगितले की, परिसरातील काही पान दुकाने आणि टपऱ्यांच्या आडून गांजा, ड्रग्स तसेच बंदी असलेल्या नशेच्या गोळ्यांची विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जात असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकारामागे ड्रग्स माफियांचे जाळे कार्यरत असल्याचा आरोपही त्यांनी केला असून, या माफियांना काही राजकीय नेत्यांचे आशिर्वाद असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मांजरी बु., महादेवनगर आणि केशवनगर परिसरातील नागरिकांनी देखील पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ड्रग्स माफियांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी तातडीने विशेष कारवाई मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


MahaTET गळतीमुळे सेवांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी TET रद्द करण्याची मागणी पुनरुज्जीवित झाली, शिक्षक आणि राजकारणी वारंवार लीकचा निषेध करतात, विद्यार्थ्यांचा विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी जबाबदारीची मागणी करतात

14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

MahaTET गळतीमुळे सेवांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी TET रद्द करण्याची मागणी पुनरुज्जीवित झाली, शिक्षक आणि राजकारणी वारंवार लीकचा निषेध करतात, विद्यार्थ्यांचा विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी जबाबदारीची मागणी करतात

error: Content is protected !!