पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई; रहिवाशांचे पुणे महानगर पालिकेला निवेदन


पिण्याच्या पाण्याचा तीव्र प्रश्न; रहिवाशांचे  पुणे महानगर पालिका प्रशासनाकडे निवेदन…..

पुणे (प्रतिनिधी):  पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.आठवड्यातुन एकदा टॅकर येतो तो पण दुषित या पार्श्वभूमीवर सर्व रहिवाशांनी एकत्र येत पुणे महानगर पालिका प्रशासनाकडे लेखी निवेदन दिले आहे.

नियमित व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नसल्याने महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आठवड्यातून एकदा टँकरद्वारे होणारा पुरवठा अपुरा ठरत असून काही भागात तो पूर्णपणे बंद असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.शेजारी स्वप्नपूर्ती सोसायटी त्यांना पाणी पुरवठा मग आम्हाला का नाही ?

क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी नागरिकांच्या पाठीशी उभे राहत पुणे महानगर पालिका प्रशासनाने तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. “पिण्याचे पाणी, रस्ता, ड्रेनेज लाईन हा आमचा मूलभूत हक्क आहे. तो नाकारला जाणार नाही,” असा इशाराही देण्यात आला आहे.

पुणे महानगर पालिका प्रशासनाने त्वरित दखल घेऊन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित व सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.यांच्या पाठीशी खंबीरपणे क्रांती शेतकरी संघटना उभी राहिली असे अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी सांगितले.


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!