प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचा आक्रमक प्रचार; वाड्या-वस्त्यांत गाठीभेटी, सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन
दिवे–गराडे (ता. हवेली) येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजपच्या उमेदवारांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत वाड्या-वस्त्यांमध्ये जाऊन मतदारांच्या थेट गाठीभेटी घेतल्या. कमळाला मतदान करा असे आवाहन करत भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या प्रचार मोहिमेत भाजपच्या लाडक्या बहिणींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला. महिला, युवक, शेतकरी व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावोगावी बैठका, शेतकरी संवाद सभा तसेच युवकांशी थेट संवाद साधत जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. त्या समस्या सोडविण्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात आले.
प्रचारादरम्यान “गुलाल आम्हीच उधळणार” असा आत्मविश्वास व्यक्त करण्यात आला. युवक मतदान व युवा पिढीचा भक्कम पाठिंबा भाजप उमेदवारांना मिळत असल्याचे चित्र दिसून आले.
या वेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राहुल कुल, मा. मंत्री दादा जाधवराव, मा. आमदार संजयजी जगताप मा.आमदार अशोकराव टेकावडे तसेच गंगाराम जगदाळे मा.दिलीपशेठ कटके. प्रहार संघटनेचे सुरेखा ताई ढवळे यांनी उपस्थित राहून भारतीय जनता पार्टीला बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या जोरदार प्रचारामुळे दिवे–गराडे जिल्हा परिषद व पंचायत समिती गणा






मध्ये भाजप उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी आणि जनतेने व्यक्त केला आहे.सर्व मतदाराने दि.७/२/२०२६ या दिवशी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचा आपला हक्क बजावावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आला.









