देवदर्शन करून मतं मागणाऱ्यांना ललिता कटके यांचा सवाल — विकास कुठे आहे?


देवदर्शन करून तालुक्याचा विकास करणार का? — गराडे गणातील ललिता कटके यांचा विरोधकांना जाहीर सवाल

सासवड (ता. पुरंदर) :

गराडे गणातील निवडणूक प्रचारादरम्यान ललिता कटके यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत “देवदर्शन करून तालुक्याचा विकास करणार का?” असा जाहीर सवाल उपस्थित केला आहे. केवळ धार्मिक दर्शन व दिखाऊ कार्यक्रमांवर भर देऊन विकास साध्य होत नसून, प्रत्यक्ष कामातूनच तालुक्याचा विकास घडतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

गराडे गणातील विविध गावांमध्ये घेतलेल्या भेटीदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधताना ललिता कटके यांनी महिलांशी शेतात जाऊन संवाद साधला. यावेळी महिलांनी शेती, रोजगार, पाणीटंचाई, आरोग्य, शिक्षण आदी समस्यांचा पाढा वाचला. “महिलांना केवळ मतांसाठी वापरले जाते, पण निवडणुकीनंतर त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होते,” अशी भावना महिलांनी व्यक्त केली.

ललिता कटके म्हणाल्या की,

“महिलांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत प्रत्यक्ष पोहोचणे गरजेचे आहे. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सुविधा, रोजगार या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम झाले पाहिजे. केवळ आरोप-प्रत्यारोप किंवा देवदर्शनाचे फोटो काढून विकास होत नाही.”

त्यांनी पुढे सांगितले की, गाडे गणातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दर्शवला असून परिवर्तनाची अपेक्षा व्यक्त केली आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी शेतीपूरक उद्योग, बचतगटांना प्रोत्साहन, प्रशिक्षण व रोजगारनिर्मिती यावर भर दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

या प्रचारादरम्यान ललिता कटके यांचा थेट संवाद, साधी मांडणी आणि स्थानिक प्रश्नांवरील स्पष्ट भूमिका यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे. गाडे गणात परिवर्तनाची हवा वाहत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!