भेकराई डेपो :दोरीने बांधलेली ई-बस रस्त्यावर! अनफिट बसमुळे युवतीचे दोन्ही पाय चाकाखाली; फिटनेस देणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह!!


अनफिट ई-बसला फिटनेस सर्टिफिकेट कसे? बाहेर निघालेल्या पत्र्यामुळे युवतीचा भीषण अपघात; जनतेकडून अधिकाऱ्यांवर थेट प्रश्नचिन्ह

भेकराई नगर डेपो अंतर्गत धावणारी एक ई-बस पूर्णतः अनफिट असतानाही तिला फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सदर ई-बसचा साईडचा पत्रा बाहेर निघालेला असून तो तात्पुरत्या स्वरूपात दोरीने बांधण्यात आला होता. तरीही ही बस थेट रस्त्यावर प्रवासी वाहतूक करत होती, ही बाब अत्यंत धक्कादायक आहे.

याच अनफिट ई-बसमुळे एका युवतीचा भीषण अपघात घडला. बसचा बाहेर निघालेला पत्रा युवतीला लागल्याने ती रस्त्यावर कोसळली आणि त्याच क्षणी बसचे दोन्ही चाके तिच्या पायांवरून गेल्याने तिचे दोन्ही पाय गंभीर जखमी झाले. अपघातानंतर तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात असून, फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर जनतेने थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नियमांनुसार कोणतीही सार्वजनिक वाहतूक बस सेवेत आणण्यापूर्वी सखोल तांत्रिक तपासणी करणे बंधनकारक असताना, प्रत्यक्षात असुरक्षित बसला “फिट” कसे घोषित करण्यात आले, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणात केवळ ई-बस व्यवस्थापनच नव्हे, तर फिटनेस सर्टिफिकेट देणारे अधिकारी, देखरेख करणारे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांचीही जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे. अपघातानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल उपस्थित होत असून संपूर्ण यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनेनंतर भेकराई नगर डेपो मॅनेजर यांनी संबंधित ई-बस मॅनेजरवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सर्व ई-बसची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी जनतेसह सामाजिक संघटनांकडून केली जा

त आहे.


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!