महाराष्ट्र राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे राज्यात शोककळा; पुणे विभागातील सर्व शासकीय कार्यालये बंद!!!


अजित पवार यांच्या निधनानंतर शासकीय कार्यालये बंद ठेवण्याबाबत पुणे विभागीय आयुक्तालयाचे पत्र …

पुणे | प्रतिनिधी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजित अनंतराव पवार यांच्या निधनानंतर राज्यात शासकीय पातळीवर दुखवटा पाळण्याबाबतचे एक अधिकृत पत्र …

📄 पुणे विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग यांच्या वतीने दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, अजित पवार यांच्या निधनामुळे सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

📌 पत्रातील महत्त्वाचे निर्देश

पत्रात नमूद केल्यानुसार —

28 जानेवारी 2026 (बुधवार) रोजी

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील

सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत.

28 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत

सर्व शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर (Half Mast) फडकवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या कालावधीत कोणतेही शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असेही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

🏛️ जिल्हाधिकाऱ्यांना व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना

सदर पत्र पुणे विभागातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आले असून, तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

🔍 प्रशासकीय वर्तुळात खळबळ

हे पत्र समोर आल्यानंतर प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या विषयावर राज्य शासनाकडून किंवा माहिती व जनसंपर्क विभागाकडून स्वतंत्र अधिकृत निवेदन येण्याची प्रतीक्षा आहे.

🔴 ही बातमी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्राच्या आधारे देण्यात येत आहे.


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!