थापेगावची जनता भाजपा उमेदवार दिव्याताई. च्या पाठीशी; विकासाच्या मुद्द्यांवर ठाम विश्वास
सासवड थापेगाव :
दिवे–गराडे जिल्हा परिषद गट व गराडे पंचायत समिती गणाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थापेगाव मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार दिव्याताई गंगाराम जगदाळे (शेडकर) यांना थापेगावच्या जनतेचा भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. “थापेगाव जनता पाठीशी” असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
भाजपा उमेदवार दिव्याताई गंगाराम जगदाळे (शेंडकर)यांनी प्रचारादरम्यान शेती व शेतकरी विकास, पाणी व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, तरुणांसाठी रोजगार, आरोग्य व शिक्षण सुविधा, रस्ते व मूलभूत सोयी-सुविधा या मुद्द्यांवर भर दिला आहे. पारदर्शक आणि परिणामकारक विकासाचे आश्वासन देत त्यांनी थेट जनसंवाद साधला आहे.
त्याचप्रमाणे गराडे पंचायत समिती गणासाठी भाजपा उमेदवार सौ. कटके ललिता दिलीप यांनाही महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व सर्वसामान्य नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही उमेदवारांचा विकासाचा स्पष्ट अजेंडा आणि कामाची पद्धत पाहता थापेगावसह परिसरातील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
थापेगाव मधील नागरिकांनी कमळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून भाजपा उमेदवारांना मोठ्या बहुमताने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, येणाऱ्या निवडणुकीत विकासालाच मत देणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.









