हडपसर–सातवाडी प्रभाग १६ : चारही जागांवर वेगवेगळ्या पक्षांचा विजय ….दोन भाजपा,एक उबाठा ,एक राष्ट्रवादी (अ.प)
पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत हडपसर–सातवाडी प्रभाग क्रमांक १६ हा अत्यंत चुरशीचा ठरला. या प्रभागातील १६-अ, १६-ब, १६-क व १६-ड अशा चारही जागांचे निकाल जाहीर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजप व अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवत राजकीय समीकरणे बदलली आहेत.
प्रभाग १६-अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला)
या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) च्या वैशाली बनकर यांनी 13,879 मते मिळवत विजय मिळवला. उबाठा गटाच्या पल्लवी सुरसे यांना 13,531 मते मिळाली. भाजप, शिवसेना व नोटाला देखील लक्षणीय मते मिळाल्याने ही लढत अत्यंत चुरशीची ठरली.
प्रभाग १६-ब (सर्वसाधारण महिला)
या जागेवर भाजपच्या विजयी उमेदवार उज्ज्वला जंगले यांनी 16,310 मते मिळवत स्पष्ट विजय मिळवला. उबाठा गटाच्या नलिनी विजय मोरे यांना 11,697 मते मिळाली. राष्ट्रवादी (अ.प.), राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना तसेच अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या प्रमाणात मते घेतल्याने मतविभागणी दिसून आली.
प्रभाग १६-क (सर्वसाधारण)
या प्रभागात उध्दव ठाकरे गटाचे विजयी उमेदवार नितीन गावडे यांनी 14,083 मते मिळवत विजयाची बाजी मारली. भाजपचे संदीप ढवळी यांना 13,679 मते मिळाली. राष्ट्रवादी, शिवसेना व इतर पक्षांनाही काही प्रमाणात मते मिळाल्याने अपक्ष उमेदवाराचा विजय चर्चेचा विषय ठरला आहे.
प्रभाग १६-ड (सर्वसाधारण)
या जागेवर भाजपचे मारुती तुपे यांनी 19,889 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) चे योगेश ससाणे यांना 13,616 मते मिळाली. या प्रभागात भाजपने मोठे मताधिक्य मिळवत आपली ताकद दाखवून दिली.
एकूणच प्रभाग क्रमांक १६ मध्ये कोणत्याही एका पक्षाला पूर्ण वर्चस्व मिळाले नसून राष्ट्रवादी, भाजप व अपक्ष उमेदवारांनी जागा मिळवत मतदारांनी संमिश्र कौल दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला, तर पराभूत उमेदवारांनी निकाल स्वीकारत पुढील काळात जनतेसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
हडपसर–सातवाडी प्रभागातील हे निकाल आगामी महापालिका राजकारणावर मोठा प्रभाव टाकणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.








